जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांचेकडुन सन 2021-22 या वर्षातील 11 वी प्रवेशासाठी खेळाडू कोटयातुन प्रवेशासाठी क्रीडा प्रमाणपत्र दिले जाणार आहे. शासन निर्णयानुसार संबधित खेळाडूने 8, 9 वी 10 या इयत्ते मध्ये ग्राहय असलेल्या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग किंवा प्राविण्य व राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य असलेल्या खेळाडूंना सदरचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ( सन 2018-19, 2019-20 व 2020-21 या वर्षातील क्रीडा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ) यानुसार पात्र असलेल्या खेळाडूंनी सोबतच्या विहित नमुन्यातील अर्जासोबत क्रीडा प्रमाणपत्राची सत्यप्रत सादर करणे आवश्यक आहे. ( सोबत स्पर्धेचे मुळ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ) पात्र असलेल्या खेळाडूंना दि. 17.08.2021 पासुन दुपारी 12.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, शास्त्रीनगर, येरवडा, पुणे येथे विहीत नमुन्यातील अर्ज सादर केल्यानंतर सदरचे प्रमाणपत्र दिले जाईल असे अवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री राजेश बागुल यांनी केले आहे. त्यानुसार सर्व पात्र खेळाडूंनी 11 वी प्रवेशासाठी क्रीडा प्रमाणपत्रासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.
(टिप : सदरचे प्रमाणपत्र हे पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत होणा-या 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेसाठीच आहे यांची नोंद घ्यावी. )
विहित नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा