11 प्रवेश प्रक्रीया सन 2020-21 बाबत सूचना

सन 2020-21 या वर्षात 11 वी प्रवेशासाठी खेळाडूंना खेळाडू कोटयातुन प्रवेशासाठी प्रमाणपत्र दिले जाते. या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व अर्ज ऑनलाईन मागवुन प्रमाणपत्र सुध्दा ऑनलाईन दिले जाणार आहे. त्यामुळे आंतराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग किंवा प्राविण्य व राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य असलेल्या खेळाडूंनी आपले अर्ज सोबतच्या विहित नमुन्यात आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य असल्याचे प्रमाणपत्र जोडुन dsopune6@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवावेत. प्राप्त अर्जाची छाननी झाल्यावर पात्र खेळाडूंना २/३ दिवसात प्रमाणपत्र त्यांनी पाठविलेल्या ईमेल आयडीवर मिळतील असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री विजय संतान यांनी कळविलेले आहे.

विहित नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा