फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रम

केंद्रीय युवा व खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी पुढाकार घेवून फिट इंडिया फ्रीडम रन हा नवीन उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. धावणे हे मानवी शरीराचे सर्वाम मोठे स्वातंत्र्य आहे. तयास नेहमी तंदुरुस्त नियमीत व्यायामाची आवश्यकता असते. फिट इंडिया फ्रीडम रन हा उपक्रम पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे ग्रामीण क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, क्रीडा संघटना, क्रीडा मंडळे, तसेच सर्व नागरीकांच्या व्यापक स्तरावर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, तसेच उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभाग, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांचेकडून संयुक्त रित्या दि.29 ऑगस्ट 2020 रोजी पासुन राबविण्यात येत आहे.

  • तुम्ही कोठेही कधीही धावु/ चालु शकता किंवा सायकलिंग करु शकता अशी या उपक्रमामागील संकल्पना आहे.
  • प्रत्येक जण धावण्यासाठी /चालण्यासाठी/ सायकलिंगसाठी आपल्या आवडीचा मार्ग, व्यक्तिश:
  • आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेवुनही धावणे / चालणे /सायकलिंग करु शकणार आहेत.
  • प्रत्येकास स्वत:च्या शारीरिक क्षमतेनुसार वेगाने धावणे /सायकलिंग/चालण्याची मुभा असणार आहे.
  • स्वयंचलितपणे किंवा कोण्त्याही ट्रॅकींग ॲप किंवा जीपीएस घडयाळाचा वापर करुन धावलेलया
  • /चाललेल्या/सायकलिंग अंतराचा मागोवा घेता येणार आहे.
  • यासाठी सर्वांनी धावणे/ चालणे/ सायकलिग ही क्रीया पुर्ण केल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरुन सादर करावयाचा आहे.
  • सर्वांनी धावणे/ चालणे/सायकलिंग ही क्रीया पुर्ण केल्यानंतर येथे क्लिक करा.
  • सहभागींना दि.02 ऑक्टोबर 2020 रोजी पासुन प्रमाणपत्र डाऊनलोड करुन घेता येतील.

सहभागी होणेकरीता खालील लिंक वर रजिस्ट्रेशन करावे.

Form Link